24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमहाराष्ट्रमोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पतंगबाजीला उधाण

मोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पतंगबाजीला उधाण

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.८ (प्रतिनिधी) राज्याच्या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये २० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात पतंगाबाजीला उधाण आले आहे. पंतप्रधानांसोबत व्यक्तिगत भेट झाली व आम्ही सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मराठा आरक्षण व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नांसह राज्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्वाचे प्रश्न चर्चिले गेले. पण बाहेर चर्चा रंगली ती या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोघांचीच झालेल्या भेटीची.

राज्यातील राजकीय समीकरण बदलणार, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार, या भेटीमुळे दुरावा कमी होणार, असे वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे त्यांनी पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाल्याचे मान्य केले. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असंही ते म्हणाले.

राजकीय संदर्भ काढण्याची गरज नाही -संजय राऊत
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी या भेटीला राजकीय रंग देण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे सांगितले. ज्यांना राजकीय संदर्भ काढायचे आहेत, त्यांना काढू देत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आम्हाला नेहमीच आदर होता व आहे. ठाकरे परिवार आणि मोदींचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनात किती आदर आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हीही नेहमीच त्यांचा आदर केला असल्याचे राऊत म्हणाले.

केंद्र आणि राज्य यांच्यात योग्य समन्वय असावा, ही आमची कायम भूमिका राहिली आहे. संघर्ष कायम नसतो. केव्हातरी संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. आज जर पंतप्रधानांनी तासभर महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले आहेत, तर संघर्षाची भाषा कशाला ? असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला. या भेटीमुळे राज्यात काही बदल होईल किंवा राजकीय समीकरण बदलेल ही चर्चा व्यर्थ आहे. सरकारचा अजून साडेतीन वर्षाचा कालावधी आहे. पुढेही महाविकास आघाडीचं सरकार राहिल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील. त्यात थोडाही बदल होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या