27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रप्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली पैशाने भरलेली बॅग

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडली पैशाने भरलेली बॅग

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर चोरीच्या सामानाची बॅग सापडली आहे. या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज होता.

रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने घराच्या बाहेर बॅग ठेवली. मात्र, ही व्यक्ती कोण आहे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. या घटनेबाबत लाड यांनी सांगितले की, पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला एक बॅग पडली आहे. मी पाहिले त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅगा होत्या.

पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस पथक आले. सोने, चांदी, पैसे, मूर्ती हा ऐवज होता. माझ्या घराबाहेर २४ तास पोलिस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसला होता. त्यांनी त्याला हटकले असता त्याने ती बॅग टाकून पळ काढला.

या प्रकाराची घटना माझ्या घराबाहेर दुस-यांदा घडली आहे. बॅगेत दुसरे काही असते तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीची गस्त वाढवावी, अशी विनंती प्रसाद लाड यांनी पोलीसांना केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या