26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रयेत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या हलक्या सरींनी सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील काही भागात पाऊस पडत आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे.

रायगड ते पश्चिम किना-यापर्यंत मध्यम तीव्रतेचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि गोवा या परिसरात ढगाळ वातावरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काल कोकणात पुन्हा चांगला पाऊस झाला असून काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. हे सर्व वातावरण पाहता येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्­यता वर्तवली आहे. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या