24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रमान्सून महाराष्ट्रात दाखल

मान्सून महाराष्ट्रात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मान्सून शनिवार दि़ ५ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला असून मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला परिस्थिती अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली. दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला आहे. गुरुवारी सकाळपासून केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाºयांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली. कर्नाटकच्या किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल झाला.

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल. याशिवाय पुढील २ ते ३ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रामदेवबाबांच्या कोरोनिलवर ‘आयएमए’चा आक्षेप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या