21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

१७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या