मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७० % एवढे झाले आहे.
आज राज्यात ५,१८२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१०,५९,३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,३७,३५८ (१६.६१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४८,१३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस