28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज ४८ हजारांहून अधिक कोरोनामुक्त; २६,६१६ नव्या रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसºया लाटेने थैमान घातलेले असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने लॉकडाऊनही १ जूनपर्यंत वाढवला आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून, आज राज्यात फक्त २६,६१६ रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यात आज २६,६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज ५१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा १.५३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज २६,६१६ नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात आज रोजी एकूण ४,४५,४९५ सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,०५,०६८ झाली आहे.

डायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या