30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख २० हजार ५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४७ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याचा राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २० हजार ५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात ९० हजार ९९७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या