26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच आहे. आज दिवसभरात ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनारुग्णांची एकूण संख्या १८ लाख ०८ हजार ५५० इतकी झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची ही संख्या अधिक चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाने विळखा घातला आहे. मध्यंतरीच्या काळात ही रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आजही करोनावर मात केलेल्या रुग्णांपेक्षा कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या