34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून गेल्या २४ तासात तब्बल ८ हजार ३३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात २५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.

बऱ्यापैकी नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गात मागच्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. मुंबई,पुणे, नागपूर बरोबरच ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही रोज वाढते आहे. आज सुमारे पाच हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. पण त्याचवेळी आज ८ हजार ३३३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात ४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ६७ हजार ६०८ ॲक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात ३ लाख १८ हजार ७०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

…तर काही निर्बंध घालावेच लागतील – वडेट्टीवार
दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागतील असे सुतोवाच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले. उपनगरीय रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी खुली केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने ही सवलत रद्द होणार अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी, मुंबईची लोकल पूर्णपणे बंद न करता गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्यांचं नवीन वेळापत्रक तयार केलं जाईल. त्यासोबतच बसेसमध्ये देखील होणारी गर्दी नियंत्रणात येण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील, असे सांगितले. यंदा सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबतही विचार सुरू आहे. लग्नकार्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन मंगलकार्यालयांवर पुन्हा काही निर्बंध आणावे लागतील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन निश्चित: देसाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या