25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रबहुतांश घटकांचा विचार नाही - फडणवीस यांची टीका

बहुतांश घटकांचा विचार नाही – फडणवीस यांची टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचवेळी विविध घटकांसाठी ५ हजार ४७६ कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले असून त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. या पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचार करण्यात आलेला नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे

मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही फडणवीस म्हणाले.

लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल, असेही फडणवीस म्हणाले. कोविड प्रतिबंधासाठी जो ३३०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो अर्थसंकल्पातील घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

सचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या