करमाळा: करमाळा तालुक्यातील गौडरे येथे एका विवाहितेने लहान मुलासह पेटवून घेऊन आ त्महत्त्या केली आहे.हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी १॰.३॰वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अंजली दत्तात्रय अंबारे (वय२७)असे आत्महत्त्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे.
तर तिच्या लहान मुलाचे नाव शंभुराजे(वय२)असे आहे. अंजलीचा पती दत्तात्रय अंबारे हे गवंडी म्हणून काम करतात. ते सकाळीच कामावर गेले होते, तर . सासरे अंगद अंबारे अंजलीचा मोठा मुलगा रविराज यास शाळेतून आणण्यासाठी गेले होते. अंजली व शंभुराजे या दोघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले.
शेजारी रॉकेलची रिकामी बाटली आढळून आली. अंजलीची आत्महत्त्या की हत्त्या याबाबत तपास सुरू आहे.घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हीरे व पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले . याबाबत करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.