अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई भाजपात प्रवेश केला आहे. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या सरपंच असून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. शशिकला पवार या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर २२७ मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणा-याा शशिकला पवार यांनी गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर थोरात गटाने सुद्धा शशिकला शिवाजी पवार आमच्या गटात असल्याचा दावा केला होता. मात्र आता भाजप प्रवेशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.