23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रएनआयएने कोल्हापुरातून उचललेल्या पीएफआयच्या मौला मुल्लाला १२ दिवसांची पोलिस कोठडी

एनआयएने कोल्हापुरातून उचललेल्या पीएफआयच्या मौला मुल्लाला १२ दिवसांची पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापे टाकले. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने कारवाई करताना ‘पीएफआय’च्या १०६ जणांना जेरबंद केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश असून त्यामधील एक कोल्हापूर शहरातील आहे. मौला मुल्ला (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याला नाशिक येथील न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘एनआयए’ने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने कोल्हापूरसह औरंगाबाद, पुणे, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे छापे टाकले. यामध्ये २० जणांना अटक करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे ४ गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू आहे. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे भरवणे, दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे अशा कामांत गुंतलेल्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे ‘एनआयए’मधील सूत्रांनी म्हटले आहे.

नऊ महिन्यांपासून होता पोलिसांच्या रडारवर
बुधवारी मध्यरात्री कोल्हापूर शहरातील जवाहरनगर-सुभाषनगर परिसरात राहणा-या सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमधून मौला नबीसाब मुल्लाच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल अपार्टमेंटमधील दुस-या मजल्यावरील मुल्लाच्या फ्लॅटवर छापा टाकत ताब्यात घेतले तेव्हा त्याची पत्नी व दोन मुले उपस्थित होती. संशयितावर राजारामपुरी पोलिसांची करडी नजर गेल्या अनेक महिन्यांपासून होती. मुल्लाकडून गेल्यावर्षी ६ डिसेंबर २०२१ मध्ये विक्रमनगरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर याप्रकरणी संशयितावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलची हवाही खाल्ली होती. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांकडून तो रडारवर होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या