25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रखासदार नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल

खासदार नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल

एकमत ऑनलाईन

नागपूर- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत.

दिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या