24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रखा. नवनीत राणा, आ. रवी राणा ताब्यात

खा. नवनीत राणा, आ. रवी राणा ताब्यात

एकमत ऑनलाईन

अमरावती : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलिस आयुक्त कार्यालयात नेले.

जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा घणाघाती आरोप राणा दाम्पत्याने केला आहे, तर खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टाने जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतक-यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. तसेच हजारो शेतक-यांसह सोमवारी (१६ नोव्हेंबर) मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा हे आज थेट मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी निघाले होते. त्यांना अमरावती येथे रोखून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे हा राजकीय वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

लुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या