हिंगोली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज २२ जुलै खासदारकीची शपथ घेतली. यात हिंगोलीचे राजीव सावत यांनी मराठीतून शपथ घेतली.
लोकसभेच्या निवडणुकीत गुजरात राज्याच्या प्रभारी अशी जबाबदारी असल्याने राजीव सावत यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उभे न राहता पक्षाचे काम करण्याला पसंती दिली़ यानंतर सातव यांनी गुजरात राज्यातील पक्ष कार्यात स्वत:ला झोकून दिले होते़ सातव हे राहूल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सभेवर पक्षाकडून संधी दिली़ सलग तीन वेळा लोकसभेत संसद रत्न पुरस्कार मिळविून संसदेत आपल्या बुलंद आवाजाची छाप टाकल्यानंतर आता साववांचा आवाज राज्यसभेत गुंजणार आहे.
सातवांच्या सोबत आज राज्यसभेत आज सात खासदारांचा शपथ विधी पार पडला़ यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ना़ रामदास आठवले, भाजप नेते उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली.
Read More धनादेश अनादर प्रकरणी येरमाळा येथील एकाला सहा महिने कारावास