31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रखासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवरील बारा जणांना कोरोना

खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवरील बारा जणांना कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बंगला सिल्व्हर ओकवर बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यातील पाच जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहे. तर एक स्वयंपाक करणारी महिला तर एका ड्रायव्हरचा समावेश आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.

मंत्री बाळासाहेब पाटील पॉझिटिव्ह आल्यानंतर कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात हे कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. वरळी डोम इथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आता महापालिका सिल्वर ओक परिसरात फिव्हर कॅम्प घेणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे. दरम्यान कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला देखील कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.

पुण्यातील पाच प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये या अ‍ॅँटिबॉडी आढळल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या