मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी आपले मोबाईल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थांना आणि उमेदवारांना फायदा होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप नि:शुल्क उपलब्ध आहे.
यासंदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. त्याचबरोबर अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केलेल्या विविध भरती परिक्षांची माहिती उमेदवारांना सुलभरित्या मिळावी यासाठी आयोगाने हे अॅप सुरू केले आहे.