26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानी पायउतार होणार

मुकेश अंबानी पायउतार होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदावरून पायउतार केला आहे. रिलायन्स जिओ बोर्डाची २७ जून २०२२ रोजी बैठक झाली. बैठकीत रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी २७ जूनला कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पंकज मोहन पवार २७ जूनपासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंकज मोहन पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहे.

रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही. चौधरी यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांनी २७ जून २०२२ पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश एम. अंबानी यांची गैर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती मंजूर करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या