मुंबई : आयपीएल स्पर्धेत पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला तब्बल ९ सामने आतापर्यंत गमवावे लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील त्यांचे केवळ दोन सामने शिल्लक असून यामधील एक सामना आज हैदराबाद संघाविरुद्ध असेल. दरम्यान या सामन्यात तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार का? याकडे मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष लागून आहे. त्यात सामन्यापूर्वी सोमवारी मुंबई इंडियन्सने अर्जुनचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केल्याने आता तरी अर्जुनला संधी मिळणार का या चर्चेला आणखीच उधाण आले आहे.
काय आहे पोस्ट?
अर्जुन एक अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्या दमदार उंचीमुळे तो भेदक गोलंदाजी करतो. दरम्यान मुंबई इंडियन्सने अर्जुनचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केला असून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘स्लोवर बॉल टाकू की फास्टर यॉर्कर, अशा दोन विचारांत अर्जुन असावा.’ असे कॅप्शन मुंबईने दिले आहे.