मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे संजय पांडे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था याच्या संदर्भात भेटीत चर्चा झाली आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणावरही चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्री केतकी चितळे हिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत एक आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केली होती. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर ठाणे पोलिसांनी अटक केली.