26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राणा दाम्पत्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार आहे. यासाठी ८ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश या नोटिशीतून देण्यात आले आहे.

सरकरी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ अन्वये खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस ८ जून रोजी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावर ठाम असल्यानं शिवसैनिकांनी याला विरोध करत राणांच्या घराबाहेर आदोलन केलं होतं.

राणा दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम असल्यानं पोलीस त्यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी त्यांच्या खार येथील घरी गेले होते. याकामात राणांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. उलट पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप केला. या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या