27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिसांच्या सुट्या रद्द, १२ तास ड्यूटी

मुंबई पोलिसांच्या सुट्या रद्द, १२ तास ड्यूटी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी गुवाहाटीत गेलेल्या आमदारांच्या कार्यलयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सध्या शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस अंमलदार व हवालदारांची ड्यूटी आठ तासांवरून १२ तासांवर करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर राहणार असून रविवारी साप्ताहिक सुटी घेणार नाही. त्यांना आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्टी दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या