24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये

मुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जूनपासून मुंबईतील पोलिसांचे पगार २७०० ते ५२०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र, या वाढलेल्या पगारानंतर आता पोलिस कर्मचा-यांना बेस्टमध्ये तिकिट काढूनच प्रवास करता येणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस विभागात आनंदाचे वातावरण आहे.

एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ते एएसआयचा २७०० ते ३२०० रुपये पगार दरमहा बेस्टच्या खात्यात जायचा. इतकेच नाहीतर पीएसआय ते एसीपी यांचा ४८०० ते ५२०० रुपयांपर्यंतचा पगार हा बेस्टच्या खात्यात जायचा. त्या बदल्यात पोलिसांना बेस्टच्या बसमधून शहरभर मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

दरम्यान, अनेक पोलिसांनी याविरोधात तक्रारी केल्या की, ते लोकल ट्रेनमधून प्रवास करतात किंवा त्यांच्याकडे खाजगी वाहने आहेत. त्यामुळे फार कमी लोक सरकारी किंवा वैयक्तिक कामासाठी बेस्टच्या बसमध्ये जातात. यामुळे त्यांच्या पगारातील बेस्टचा हिस्सा त्यांना दिला तर बरे होईल. यावरच पोलिस आयुक्तांनी आढावा घेऊन त्यानंतर नवा आदेश जारी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या