24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास महागणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये पुन्हा १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. प्रत्येक ३ वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र, १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीने सांगितले.

पुणे-मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे हा मार्ग कायम चर्चेचा विषय ठरतो. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. पण टोल वाढ नित्यनेमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ६० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली.

दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट धावतो. मात्र, त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठमोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला. अनेकांची कुटुंबे उद््ध्वस्त झाली. मात्र, तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचे सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघाती मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. हा पहिलाच मोठा मृत्यू नाही तर या आधी अनेकांनी या ठिकाणी जीव गमावला आहे. अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर रुग्णवाहिका पोहचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते.

आयटीएमएसच्या आधीच टोलवाढ
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम लागू करण्याची घोषणा करण्यात आली. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीत ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणा-या प्रत्येक गाडीचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. टोलच्या दरात अवाजवी वाढ केल्याने टीका होत आहे.

संपूर्ण रस्त्यावर
सीसीटीव्हीचे जाळे
संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमे-याचे जाळे असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणा-या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील. ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. तसेच ३९ ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.

असा असेल नवा दर
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०३० पर्यंत पुणे-मुंबई प्रवासासाठी टोलचे दर असे असतील.

वाहन आताचे नवा दर
चारचाकी २७० ३२०
टेम्पो ४२० ४९५
ट्रक ५८० ६८५
बस ७९७ ९४०
थ्री एक्सेल १३८० १६३०
एम एक्सेल १८३५ २१६५

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या