26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रतिस-या लाटेसाठी मुंबई सज्ज

तिस-या लाटेसाठी मुंबई सज्ज

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात तिस-या लाटेचा धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिस-या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल पाच ठिकाणी नवे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. यात ७० टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त असणार आहेत.

नवे कोविड सेंटर
तिस-या लाटेसाठी मुंबईत ७ हजार बेड तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील ५ ठिकाणी नवे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. मुंबईत उभारण्यात येणारे नवे कोविड सेंटरचे ७० टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरू केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड
मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये २१७० बेड उपलब्ध आहेत. मालाड, महालक्ष्मी सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर २, कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा यात समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण ७००० बेड उपलब्ध होणार आहेत.

मांजरा धरणात १७.८८ टक्के पाणीसाठा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या