24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रसामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली

सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली

एकमत ऑनलाईन

मुंबई : डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. तब्बल ३० जणांनी बलात्कार केला असून, या प्रकरणात आतापर्यंत २२ जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडलीे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीत बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. काल हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर तणाव
आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला. आरोपींना कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राजकीय पक्षांनी दिला आहे.

आरोपीना आमच्या ताब्यात द्या
डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या,आम्ही त्यांची धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पोलिस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या, आशा घोषणा दिल्या.

राज्यात भयाचे वातावरण
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात भयाचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवली भाग जो एक शांत भाग समजला जातो, तेथे ही घटना घडली आहे. राज्य सरकारने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.

बलात्काराच्या घटनांवर चिंतन आवश्यक
वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणावर सरकारने दोन दिवस अधिवशेन बालावून चिंतन करावे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. साकीनाकानंतर आता डोंबवली प्रकरण राज्यातील अत्याच्याराच्या घटना आता सांगायला सुरवात केली तर २४ तास कमी पडतील. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षित ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत आहेत. इतर राज्यांतील घटनांचे उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करता, हे बरोबर नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या