मुंबई : राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईतही किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे.
मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर १५.०६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नवीन वर्षात मुंबईत हुडहुडी वाढली आहे. तापमानाचा पारा घसरल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.