31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रमुंबईचा वडापाव ठरला जगात १३ वा

मुंबईचा वडापाव ठरला जगात १३ वा

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत गेलात आणि वडापाव खाल्ला नाहीत असे शक्यच नाही. मुंबईच्या लोकलच्या धकाधकीत आणि जाम ट्रॅफिकच्या गर्दीत मुंबईकरांचा एवमेव सहारा म्हणजे वडापाव. मुंबईच्या वडापावची बातच निराळी. अगदी सिनेमांमध्येसुद्धा मुंबईचा सीन असेल तर वडापाव गाडी ही आवर्जून दाखवली जाते. वडापावच्या संदर्भात एक मोठी बातमी पुढे आली आहे. मुंबईच्या वडापावाला जगात मानाचे स्थान मिळाले आहे.

टेस्ट अ‍ॅटलास या वेबसाईटने जाहीर केलेल्या ५० बेस्ट सँडविचची यादीत मुंबईचा वडापाव १३ व्या क्रमांकावर आहे. टेस्ट अ‍ॅटलास जाहीर केलेल्या यादीत तुर्कीचा टॉम्बिक पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुस-या आणि तिस-या क्रमांकावर अनुक्रमे दक्षिण आफ्रिकेचा बुटीफारा आणि अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमो आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविच आहेत, ज्यात मुंबईच्या लाडक्या वडापावचा समावेश करण्यात आला आहे.

वडापावच्या जन्माची कहाणीही रंजक आहे. वडापावचा जन्म १९६६ साली दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर झाला. याच दरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. १९७० ते १९८० च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या.

मजुरांमुळे लोकप्रियता
त्यानंतर मुंबईच्या गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली.

मुंबईतील महत्वाची ठिकाणे
आता मुंबईकरांचा आवडता वडापाव अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला. मुंबईत अशी काही ठिकाणंसुद्धा आहेत जी फक्त वडापावासाठीच प्रसिद्ध आहे. जसे की अशोक वडापाव (किर्ती कॉलेज वडापाव), भाऊचा वडापाव (मुलुंड, पश्चिम), आनंद वडापाव (खाऊगल्ली), सम्राट वडापाव (जांबोरी मैदान), सारंग बंधू वडापाव (प्रभादेवी) यांचा समावेश होतो.

प्रत्येकाची भूक भागवतो
मुंबईला फिरायला गेले पर्यटक असोत किंवा मुंबईत धावपळ करत नोकरी वर जाणारा कर्मचारी वर्ग प्रत्येकाची भूक भागवणा-या मुंबईच्या वडापावाचे जगात तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाल्याने जणू भावच वाढलेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या