औरंगाबाद :भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. तसंच त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपापयोजना करायला सोपं जाईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान रविवारी जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी असावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, ‘‘मला यापासून थोडं दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे’’. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
ओबीसीची जनगणना झाली पाहिजे
‘‘ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल,’’ असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
मला थोडं बाजुला ठेवा!
रविवारच्या जालन्याच्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी अ्सावा, अशी गर्जना झाली. याच मुद्द्यावर पंकजांना विचारलं असता, त्यांनी सावध पवित्रा घेत यापासून मला थोडं बाजुला ठेवा कारण ही चळवळ मला कोणत्याही पदासून लांब राहून लढायची आहे, असं त्या म्हणाल्या.
पंकजांकडून ‘कुछ वादें’ची आठवण
पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी ंिहदीत हे ट्विट केलं आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिलं हे समजण्यासाठीच त्यांनी ंिहदीत हे ट्विट लिहिलं असावं, असं राजकीय जाणकार सांगतात.
मुंडेंवरील आरोपांवर प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘तो विषय बºयापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो . ‘मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचं राजकीय भांडवलं केलं नसतं, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच,’’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार, राज्यपाल गोव्याला निघून गेल्याने आंदोलक प्रक्षुब्ध, निवेदन फाडले !