22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeक्राइमअज्ञाताकडून भर रस्त्यात गळा चिरून हत्या

अज्ञाताकडून भर रस्त्यात गळा चिरून हत्या

एकमत ऑनलाईन

 

पिंपरी : चाकणच्या नानेकर वाडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. शशिकांत शिवाजी काशीद अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते महिंद्रा कंपनीत कामाला होते अशी प्राथमिक माहिती आहे.

रात्री उशीरा नानेकर वाडीच्या गायरान परिसरात बोलावून अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून केला आहे. शनिवार सकाळी आठ च्या सुमारास ही घटना समोर आली असून अज्ञात आरोपीचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

शशिकांत शिवाजी काशीद हे महिंद्रा कंपनीत कामाला होते. चाकणच्या नारेकर वाडीत रहायला होते. रात्री उशीरा त्यांना याच परिसरातील गायरान भागात बोलून त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. हल्यात धारदार शस्त्राने गळा चिरुन शशिकांत यांचा खून करण्यात आला. या खूनामुळे चाकण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी शशिकांत यांच्या मृतदेह नजरेस आला. या सगळ्या प्रकरणाचा चाकण पोलीस तपास करत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या