28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलिस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलिस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच आज (७ मार्च) मृत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलिस स्टेशन मुंबई येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांच्या साठ्यासह सापडलेल्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्षांबाबत ठाणे पोलिसांनी मौन बाळगल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. मुंबई पोलिस मनसुख यांची चौकशी करीत होते. ती सुरू असतानाच शुक्रवारी ठाणे पोलिसांना त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी विमल यांनी मनसुख आत्महत्या करूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली होती, तर हा घातपाताचा प्रकार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला होता.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये शुक्रवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाबाबत मौन बाळगले होते. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा विसेरा कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे.

शंभर महिलांनी कच-यालाच बनवला जगण्याचा आधार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या