23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमअंबड परिसरात परप्रांतीय कामगाराचा खून; नाशिकमध्ये हत्यासत्र थांबेना

अंबड परिसरात परप्रांतीय कामगाराचा खून; नाशिकमध्ये हत्यासत्र थांबेना

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक शहरात हत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून येवला तालुक्यातील धर्मगुरूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता नाशिक शहरात अंबड परिसरात परप्रांतीय कामगाराची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, चार जणांनी त्याचा गळा चिरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शहरातील अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत खुनाची घटना समोर आली आहे. अंबड-सातपूर लिंकरोडवरील संजीवनगरमध्ये ही खुनाची घटना घडली आहे. सदरे आलम शब्बीर शेख असे या हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंबड औद्योगिक परिसरात हत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा एका कामगाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. चार जणांच्या टोळक्याने गळा चिरून सदर तरुणाची हत्या केली आहे. सदर तरुणाला वेळीच उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते. यावेळी गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना उपस्थित नागरिक मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने त्याला वेळेवर मदत मिळू शकली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अशात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेतील अनोळखी टोळके पसार झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या