26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रगोळ्या झाडल्यानंतर दगडाने ठेचून गुंडाचा खून; सांगलीत खळबळ

गोळ्या झाडल्यानंतर दगडाने ठेचून गुंडाचा खून; सांगलीत खळबळ

एकमत ऑनलाईन

सांगली:सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कंठी येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडाचा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून खून केला. गुरुवारी मध्यरात्री घडलेला प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. धनाजी नामदेव मोटे (वय ४५, रा. कंठी) असे मृत गुंडाचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी मोटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. जत आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर शस्त्र तस्करीसह जबरी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंठी गावातील मरगुबाई मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळला. मतदेहाजवळ पिस्तुलाची काडतुसे, पुंगळ्या आणि रक्ताने माखलेले दगड पडले होते. काही अंतरावर मोटे याची दुचाकी पडली होती. हल्लेखोरांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच जतचे उपअधीक्षक रत्नाकर नवले आणि जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. जत पोलिसांसह सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. दरम्यान, खुनाच्या घटनेने कंठी परिसर हादरला आहे.

एमपीएससी पूर्व परीक्षा परीक्षा लांबणीवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या