26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये भंगार गोळा करणा-या युवकाचा खून

नाशिकमध्ये भंगार गोळा करणा-या युवकाचा खून

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमध्ये खुनाच्या घटनांना ऊत आला आहे. एक घटना घडली की दुसरी, अशा एकामागोमाग एक खुनाच्या घटना उघडकीस येत आहेत. जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील भंगार गोळा करणा-या १७ वर्षीय युवकाचा अज्ञात इसमाने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या गावात ही घटना उघडकीस आली आहे. वडनेर भैरव येथील राजेश राधेश्याम गुप्ता याने या घटनेबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार राजेश गुप्ता यांचा वडनेर भैरव येथे भंगार व्यवसाय आहे. या दुकानात सूरज तीलक प्रजापती (१७) हा कामाला होता

. सूरज हा सकाळी येऊन भंगार गोळा करण्यास जात असे. आज नेहमीप्रमाणे भंगार गोळा करण्यास गेला असता सूरज यास गावात अज्ञात व्यक्ती भेटला. तो व्यक्ती सूरज यास तुला जास्त भंगार मिळवून देतो असे सांगून सोबत घेऊन गेला.

दरम्यान गावापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळणारे परिसरातील जांबुटके धरणाजवळ नेले. या ठिकाणी सदर व्यक्तीने सूरज याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. मारहाणीत सूरज हा जागीच ठार झाला.

दरम्यान सूरज हा बराच वेळ झाला तरी पिंपळगावला परतला नाही म्हणून त्याचा मालक राजेश गुप्ता यांनी चौकशी केली असता त्याला सूरज याचा खून झाल्याचे कळले. त्यानंतर गुप्ता यांनी वडनेर भैरव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या