22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यात पोलिस निरीक्षकाच्या आईची हत्या; सलग पाचवा खून

पुण्यात पोलिस निरीक्षकाच्या आईची हत्या; सलग पाचवा खून

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत सलग खुनाच्या घटना घडत आहेत. काही दिवसांतच ५ खून झाल्याने शहरात घबराट पसरली आहे. वारजे माळवाडी परिसरात सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून झाला आहे.

रामनगर भाजीमंडईजवळ शनिवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. शाबाई अरुण शेलार (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.सातारा पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या त्या आई होत्या. अज्ञात व्यक्तीने डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शाबाई यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या दुकानातच वास्तव्य करत होत्या. सकाळी भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने त्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. खून कोणत्या कारणातून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

लातूर शहरात नियम मोडणार्यांवर पोलिसांची कार्यवाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या