26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमुस्लिम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी रक्ताने लिहिले पत्र

मुस्लिम मावळ्याने उद्धव ठाकरेंसाठी रक्ताने लिहिले पत्र

एकमत ऑनलाईन

शिर्डी : एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणा-या पदाधिका-यांची संख्याही वाढताना दिसत आहे.

मात्र, राहिलेली शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभरात संवाद यात्रा काढली आहे. शनिवारी संवाद यात्रेदरम्यान ते शिर्डीला होते. आदित्य ठाकरेंच्या शिर्डी दौ-यात शिवसेनेच्या एका मुस्लिम मावळ्याने स्वत:च्या रक्ताने आदित्य ठाकरेंना पत्र लिहिले.

शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. हे पत्र त्याने आदित्य ठाकरेंना दिले आहे. त्याने लिहिलेल्या या पत्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्तांशी संवाद साधत या दौ-याची साईदर्शनाने सांगता झाली. मात्र, यादरम्यान मुस्लिम कार्यकर्त्याने उचललेल्या या पावसामुळं लोक भावुक झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या