33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई: महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपने राज्यात आंदोलन सुरु केलें आहे. याच, पार्श्वभूमीवर राज्यपालांनीही मंदिरांबाबत मुख्यमंत्रांना पत्र धाडले आहे. या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी ठाकरे स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसंच, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणा-यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हेही माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा कंगनाच्या भेटीवरुन राज्यपालांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

मंदिरं खुली करण्यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. पत्रात मुख्यंत्र्यांच्या हिंदुत्वाच्या भुमिकेवरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले होते. ज्या सेक्युलरपणाला आपण नावे ठेवत होतात, त्याच्याविरोधात वागून आपण सेक्युलर झालात का? असा प्रश्न राज्यपालांनी मंदीरांना परवानगी न देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा सेक्युलर आहे तो आपल्याला मान्य नाही का?,’ असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी पत्रात उपस्थित केला आहे.

‘इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यपालांनी घटनेनूसारसरकार चालते का नाही हेच पहावे ; राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरूद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक सेघर्षात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. नामना बघायला मिळाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. हे राज्य घटनेनुसार चालतेय की नाही, हे त्यांनी पाहायचे आणि बाकी इतर गोष्टींसाठी लोकनियुक्त सरकार आहे. ते निर्णय घेत असते. चीनचं सैन्य लडाखच्या सीमेवर घुसले आहे. आता आपल्या सैन्याने काय केले पाहिजे, यासंदर्भात राज्याच्या मुख्यमत्र्यांनी बोलायचे नसते. देशाचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी बोलायचे असते. तसेच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जी स्थिती कोरोनामुळे उद्भवली आहे. आणि कोणत्या पद्धतीने अनलॉक करून लोकांना सुविधा निर्माण करायच्या, हे लोकनियुक्त सरकार ठरवेल. राज्यपालांनी सरकार घटनेनुसार चालले की नाही, हे पाहायचे असते असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदूह्दयसम्राट म्हणा- ठाकरेंना चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
भाजपाने मंदीर उघडण्याबाबत शिर्डी येथे केलेल्या आंदोलनावेळी मुूख्यमंत्र्यांच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन टीकास्त्र सोडले. पाटील म्हणाले, आज तर हद्द झाली. राज्यपालांनी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) पत्र लिहिले. तुम्ही मंदिर का उघडत नाही. संत महंत रस्त्यावर उतरले आहेत. तेव्हा तुम्ही उत्तर देता. मुंबईला पीओके म्हणणा-या कंगनाचं स्वागत करणा-या राज्यपालांनी मला हिंदुत्व शिकवू नये. तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरूवात होते तुमच्या घरापासूनच हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हे म्हणायचे तुम्ही टाळले. माननीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायला लागले. हिंमत असेल, तर प्रत्येक भाषणाच्या सुरूवातीला हिंदुह्रदयसम्राट म्हणा. का म्हणत नाही तुम्ही. मग कशासाठी म्हणता की माझ्या हिंदुत्वाचा मला दाखला देण्याची आवश्यकता नाही,असे म्हणता? अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मनरेगा मधील फळ लागवडीचे व ड्रिप चे अनुदान द्या :- प्रभाकर देशमुख

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या