21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा : फडणवीस

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझा : फडणवीस

एकमत ऑनलाईन

नागपूर : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच केवळ वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच नागपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ सालीच भाजपला लोकांची पसंती मिळाली, पण चुकीचे पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. या काळात मला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही याचे दु:ख नव्हते, पण मोदीजींच्या स्वप्नातला देश घडवण्यात महाराष्ट्र थांबला याचे दु:ख होते. पण महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, याची खात्री होती.

सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता काम केले, असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या जीवावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, कार्यकर्ते पाहत होते. मग शिवसेनेत उठाव झाला आणि आम्ही त्यांना साथ दिली. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते, पण सत्तेकरिता नाही, तर विचारांकरिता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला. हे प्रपोजल मी ठेवले होते, असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्रीपद घेतले याचा कमीपणा नाही
सरकारमध्ये सामिल व्हायचे नाही, असे हे मी ठरवले होते. पण भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शाह यांनी मी सरकारमध्ये सामिल व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद घेतले याचा मला कमीपणा वाटत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या