25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रनाडियादवालांच्या पत्नीला ड्रग्ज कनेक्शनवरून अटक

नाडियादवालांच्या पत्नीला ड्रग्ज कनेक्शनवरून अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांची पत्नी शबाना सईद यांना एनसीबीने अटक केली. घरातून गांजा जप्त करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली असून फिरोज नाडियादवाला यांनाही समन्स जारी करण्यात आले आहे. दरम्यान, या अगोदर आज ड्र्ग्ज पॅडलरसह अंमली पदार्थ पुरविणा-या ४ सप्लायर्सना अटक केली आहे. तसेच ३ एसयूव्ही गाड्यादेखील जप्त केल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

फिरोज नाडियादवाला यांची पत्नी शबाना यांच्याकडे दहा ग्रॅम गांजा सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीने पडकलेल्या वाहिद ऊर्फ सुल्तान नावाच्या दलालाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने रविवारी छापा टाकत ही कारवाई केली. वाहिदने शबाना यांना गांजा पुरवला होता. त्यामुळे एनसीबीच्या पथकाने नाडियादवाला यांच्या घरी छापा टाकला असता गांजा आढळून आला. गांजा जप्त करत नंतर शबाना यांनाही अटक करण्यात आली. दोन साक्षीदारांच्या समक्ष अटकेची कारवाई करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईबाबत अधिकृत माहिती दिली. या कारवाईसोबतच फिरोज नाडियादवाला यांनाही समन्स जारी करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. या निर्माते आणि दिग्दर्शकांकडे एनसीबीच्या छापेमारीस सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रभर छापेमारी झाली असून, यामध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. या कारवाईत गांजासह एमडी आणि एलएसबी ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त केले, तर एनसीबीने ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात १ ड्रग्स पॅडलर तर ४ सप्लायर्सचा समावेश आहे. कारवाईत ३ एसयूव्ही गाड्यादेखील जप्त केल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

अवैध साठा प्रकरणी ५ अटकेत
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थांचा अवैध साठा केल्याप्रकरणी एका पेडलर्ससह एकूण ५ जणांना अटक केली आहे. या पाचजणांकडून ७१७ ग्रॅम गांजा, ७४.१ ग्रॅम चरस आणि ९५.१ ग्रॅम एमडी असा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त करण्यात आली आहे.शनिवारी संध्याकाळी एनसीबीने मुंबईत चार ठिकाणी छापे मारले. अटकेतील संशयित आरोपींकडून शबाना यांचे नाव पुढे आले होते. प्रथम शबाना यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात आली.

ड्रग्स पेडलर्सची चौकशी
एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नावे समोर आली आहेत. त्या नावांच्या आधारेच एनसीबीने ही छापेमारी केली आहे. या पेडलर्सच्या जबाबाच्या आधारे अद्याप एनसीबीकडून कारवाई सुरू आहे.

अठरा लाखाच्या गुटख्यासह टेम्पो जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या