36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रनागपूरमधली फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडणार : गडकरी

नागपूरमधली फेज ३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडणार : गडकरी

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपूरमधली फेज-३ ची मेट्रो अमरावती रोडला जोडली जाईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण काल गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते निधीतून ११४ कोटी रुपयांच्या तरतूदीने रहाटे कॉलनी ते खापरी उडाणपूलापर्यंत ‘ व्हाईट टॉंिपग ‘ ची सुधारणा, खापरी रेल्वे उड्डाण पूल ते मनीषनगर लेवल क्रॉंिसगपर्यंत क्रॉक्रीट रोड, आणि शुक्रवार तलाव ते अशोक चौक या सिमेंट क्रॉक्रिट रस्त्याच्या कामाचं भूमीपूजनही गडकरी यांच्या हस्ते झाले.

रेल्वेमुळे प्रलंबित असलेल्या ८१ उड्डाण पुलांबाबतही आपण बैठक घेणार असून वर्ध्याच्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागेल. अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून उपस्थित होते. नागपूर ते काटोल हा चार पदरी रस्ता लवकर व्हावा यासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली. त्यावर या रस्त्याच्या बांधकामासाठी वन खात्याच्या परवानगीची आवश्­यकता असून मिळाली तर या रस्त्याचे काम त्वरित सुरू केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

 

२५ दिवसांत ३१ हजार ६०० शेतक-यांनी भरले ८.४८ कोटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या