24.2 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home महाराष्ट्र नागपूरची अवस्था मुंबई-पुण्यासारखी होईल : आमदार कृष्णा खोपडे

नागपूरची अवस्था मुंबई-पुण्यासारखी होईल : आमदार कृष्णा खोपडे

एकमत ऑनलाईन

नागपूर : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूर दौ-यावर मेडिकलमध्ये बेड वाढविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यासाठी लागणा-या वैद्यकीय मनुष्यबळाचा उल्लेखही केला नाही. सद्यस्थिती गंभीर आहे हे सर्वश्रुत असले तरी बेड वाढविल्यास त्यासाठी लागणारे डॉक्टर्स व अन्य आवश्यक मॅनपॉवरची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे. हे मनुष्यबळ कुठून आणणार? असा सवाल आमदार कृष्णा खोपडे यांनी आरोग्यमंत्र्यांना विचारला आहे.

सद्य:स्थितीत मेडिकलमध्ये ६०० बेड्स आहेत. म्नर्सेस व अन्य कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे येथे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाच्याच नातेवाईकांना स्ट्रेचर खेचून न्यावे लागते. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता आहे. वास्तविक येथे रुग्णांना कशी उत्तम व्यवस्था देता येईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मेयो-मेडिकलसारख्या शासकीय रुग्णालयात व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना खासगी रुग्णालयात लूटमार सुरू आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती असून, कुठे उपचार करावा, हेच कळत नाही. त्यामुळे मेयो-मेडिकलमध्ये आरोग्यव्यवस्था उत्तम करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मुंबई-पुण्यासारखे हाल करू नका
मुंबई-पुणे येथे मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असताना येथील आरोग्य व्यवस्था कोलमडली. मुंबई संपूर्ण देशात कोरोनाची राजधानी झालेली आहे. पुण्यातही गल्लोगल्ली कोरोनाचे रुग्ण आढळले. येथील जम्बो रुग्णालयाची काय अवस्था आहे ते सर्व राज्याने पाहिले. किमान नागपूरचे हाल पुणे-मुंबईसारखे करू नका.

महायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या