34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या मार्गात खिळे, आणि चिनी दिसला की पळे..

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे, आणि चिनी दिसला की पळे..

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.३(प्रतिनिधी) शेतकरी आंदोलन इंधन दरवाढ, अहमदाबादच्या स्टेडियमचे नामांतर, चीनची घुसखोरी आदी विषयांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिका केली. दिल्लीतील आंदोलनाच्यावेळी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणाऱ्या सरकारने चीनसमोर नांगी टाकल्याची टीका त्यांनी केली. हा देश कोणाची खाजगी मालमत्ता नाही. कोविडच्या काळात आम्ही आम्ही गरिबांना ५ रुपयात जेवणाची भरलेली थाळी दिली व यांनी फक्त रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितली. हाच दोन सरकारमधील मूलभूत फरक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राज्‍यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
विरोधकांच्या टीकेचा तर खरपूस समाचार घेतलाच, पण केंद्रातील मोदी सरकारवरही तिखट शब्दात टीका केली. कृषी कायद्यावरून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज, पाणी सरकारने तोडले. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. सीमेवरचे कुंपण केले. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे व चीन दिसला की पळे, अशी केंद्रातील सत्ताधाऱ्यांची अवस्था आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवता. निवडणुकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात फक्त इंधन व गॅसचे दर दुप्पट केले आहेत. याबद्दल बोलनारांना देशद्रोही ठरवले जाते. हा देश काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना म्हणतोय, मी परत येईन
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन हा प्रभावी उपाय आहे.मात्र मला गोरगरिबांची चूल विझवायची नाही. आपण आता आरोग्‍य सुविधा वाढवत आहोत.राज्‍यातील जनतेच्या जीवाची सर्वतोपरी काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.त्‍यासाठी मला कोणी व्हिलन ठरविले तरी चालेल.मला त्‍याची पर्वा नाही.मी माझया राज्‍याशी बांधील आहे.काही चुकीचे होत असेल तर निश्चित कारवाई करू.पण खोटे आरोप आणि थटटा कोणी करू नये.कारण व्हायरस कोणाला ओळखत नाही.आता तो मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन म्‍हणत परत यायचा प्रयत्‍न करत आहे.पण ही दुसरी लाट आपल्‍याला थोपवायची आहे.त्‍यासाठी मास्‍क,शारिरिक अंतर,सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा अवलंब करावाच लागेल असे मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणाले.लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्राकडे खासगी रूग्‍णालयांसाठी आपण परवानगी मागितली होती.२९ रूग्‍णालयांना आता मान्यता मिळाल्‍याचेही ते म्‍हणाले.

कोरोना नियंत्रणाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावले. केंद्राच्या अहवालाचा दाखला देऊन सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्राने कधीही कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवली नाही. काही राज्यांनी ती लपवली व त्यांचा खोटारडेपणा आता उघड होत आहे. परंतु त्यांच्या आधारे विरोधक महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. काहींनी महाराष्ट्रऐवजी केंद्राच्या पीएम केअरला मदत केली व आम्हाला हिशेब मागतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

आम्हाला हिंदुत्‍व शिकवू नका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण विरोधी पक्ष नेहमी काढतात त्‍यांना विसरला नाहीत याबददल धन्यवाद. मात्र त्याच बाळासाहेबांच्या खोलीत मी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढच्या वाटचालीबाबत चर्चा केली होती. साक्षात बाळासाहेबांच्या खोलीत आत ठरलेली चर्चा तुम्‍ही निर्लज्‍जपणे बाहेर नाकारली ? हेच का तुमचे हिंदुत्‍व? २०१४ ला तुम्‍ही युती तोडली तेव्हाही आम्‍ही हिंदू होतो,आजही हिंदू आहे आणि मरेपर्यंत हिंदूच राहणार आहे. सावरकरांना भारतरत्‍न मिळावे यासाठी दोन वेळा पत्र देण्यात आले होते.भारतरत्‍न देण्याचा अधिकार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे.मग का देत नाही असा सवालही त्‍यांनी केला. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्याचा ठराव याच विधिमंडळात मंजूर केला गेला.मग अदयाप केंद्र त्‍याला मंजुरी का देत नाही? असा सवाल करताना आम्‍ही संभाजीनगर करणारच असेही ते म्हणाले.आता भारतीय क्रिकेट टीम प्रत्‍येक मॅच जिंकणार आहे.कारण वल्‍लभभाईंचे नाव बदलून स्‍वतःचे नाव देण्यात आले आहे असा टोलाही त्‍यांनी लगावला.

विदर्भ माझे आजोळ,वेगळा होऊ देणार नाही
विदर्भ माझे आजोळ आहे.त्‍याला वेगळा कदापि होउ देणार नाही असेही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी ठणकावले. राजकारण, आरोप-प्रत्‍यारोप,मत्‍सर,द्वेष हे सर्व काही काळ बाजूला ठेऊन महाराष्ट्रच्या समृद्धीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शहरातील विकास कामे ठप्प,स्वच्छतेचा उडाला बोजवारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या