22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रनामकरण वाद: सिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार...

नामकरण वाद: सिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, ५ हजार पोलीस कर्मचारी नवी मुंबईत धडकले

एकमत ऑनलाईन

उरण (घन:श्याम कडू) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला १ लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. नवी मुंबई, पनवेल उरणमध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास ५०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस आज संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

वाहतुकीत अनेक बदल
आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

यानुसार २४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला १ लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला १ लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईत मोठा फौजफाटा तयार करण्यात आला आहे.

रामदेव बाबांची सर्वोच्च धाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या