28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्र३ -या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी...

३ -या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

एकमत ऑनलाईन

बेळगाव – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन समारंभास कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत,

सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषिवणार असून विशेष अतिथी म्हणून कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे उपस्थित राहणार आहेत, मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत, साहित्य परिषदॆचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या