24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रनांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही - प्रकाश आंबेडकर

नांगरे-पाटलांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही – प्रकाश आंबेडकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना उधणा आले आहे. या हल्ल्यासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाच्या कामावरही संशय घेतला आहे. दरम्यान, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास नांगरे-पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याचा आरोप केला आहे.

कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ज्या अधिका-यांवर ठपका ठेवायला हवा त्याच अधिका-यांवर चौकशीची जबाबदारी कशी दिली गेली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यावेळी ते म्हणाले, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची माहिती पोलिसांना होती, तरीही पोलिसांनी का कारवाई केली नाही. हे सर्व जाणीवपूर्वक झाले आहे का? याचीही चौकशी करावी, असेही त्यांनी सुचवले आहे. पुढे ते म्हणाले, पक्षाअंतर्गत आणि मित्रपक्षातही कुरघोडी होताना दिसत आहे. ही कुरघोडी खालच्या पातळीवर गेली असून व्यक्तीची सुरक्षा धोक्यात आल्याची परिस्थिती आहे. या हल्ल्याची प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या