22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिककरांना सीएनजी दरवाढीचा शॉक

नाशिककरांना सीएनजी दरवाढीचा शॉक

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिककरांसाठी मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी ८६ रुपये मोजावे लागणार आहेत.
एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किमती गगनाला भिडत आहेत.

दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी (दि. २१) सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबर आता सीएनजी वाहनधारकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

एकीकडे अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवर आकारण्यात येणा-या व्हॅटमध्ये कपात करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महागल्याने अनेकांनी वाहने सीएनजी करण्यावर भर दिला. मात्र आता सीएनजीच्या दरातच वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी पुन्हा एकदा लालपरीकडे नागरिकांची पाऊले वळू लागली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या