22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

एकमत ऑनलाईन

बीडचे सोमनाथ वाळके,
शशिकांत कुलथे राष्ट्रीय
शिक्षक पुरस्काराचे मानकरी

बीड : केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशभरातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने ५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रौप्यपदक आणि ५० हजार रुपये असे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे स्वरुप आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही शिक्षक हे बीड जिल्ह्यातील आहेत. बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या