नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोस १२ वर्षांचा विलंब होऊनही कंत्राटदाराकडून सिडकोने आतापर्यंत एकही पैशाचा दंड आकारला नसल्याचे समोर आले आहे. या मेट्रोसाठीच्या खर्चात मात्र २९१ कोटींची प्राथमिक वाढ झाल्याची माहिती आहे.
१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आज १२ वर्षे उलटूनही नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाली नाही. मात्र, एवढा विलंब होऊनही कंत्राटदाराला कुठलाही दंड आकारला नाही.